भीषण अपघात:ट्रॅक्टर आणि कार मध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर

लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली क्लिक करा

https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb

चंद्रपूर –
मंगळवारी राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु झाला तर एक युवक गंभीर जखमी आहे. यामध्ये राजुभाऊ पटेल आणि सलीम शेख यांचे प्रत्येकी एक असे दोन मुल आणि विष्णु उधवाणी आणि निमगडे शिक्षक यांचे प्रत्येकी एक प्रमाणे दोन मुलीचा समावेश. या चारही जणांना घटनास्थळीच मृत्युने कवटाळले. हिरेणभाऊ शाह (गोगरी) यांचा मुलगा योग गोगरी गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून सर्व मित्र चारचाकी वाहनाने मूल ला परत येत होते.
अजयपूर जवळ शेतामधुन निघणाऱ्या ट्र्ँक्टरने केला घात
पाचही जण एमएच-34-एम-9297 क्रमांकाच्या गोगरी यांच्या मालकीच्या क्रेटा कारने चंद्रपूर येथे गेले. वाढदिवसा निमित्य स्नेहभोजन आटोपून रात्रो १०.३० वाजताचे दरम्यान स्वगांवाकडे परत येत असतांना मूल चंद्रपूर मार्गावरील अजयपूर गांवाजवळ शेतामधून तणीस भरून अजयपूर कडे जात असलेल्या उभ्या ट्र्ँक्टरच्या ट्राली क्रमांक एमएच ३४ एल ७४५९ ला पाठीमागेहून जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की क्रेटा कारचा पुर्ण छतचं बाहेर निघुन चक्काचुर झाला. कारमधील पाच जणांपैकी स्मित राजु पटेल, अमन सलीम शेख, दर्शना विष्णु उधवाणी आणि प्रगती विजय निमगडे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर कार चालवित असलेले योग गोगरी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान पोलीस दुरक्षेत्र चिचपल्ली येथील पोलीस कर्मचा-यांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेवून सर्व मृतक आणि जखमी योग गोगरी यांना चंद्रपूर येथे हलविले. जखमी योग गोगरीवर सध्या डाॅ. मेहरा यांचे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाता मध्ये सापडलेले पाचही जण शहरातील प्रतिष्ठीत कुटूंबातील सदस्य असून ते बालमित्र होते.

मृतकांपैकी स्मित पटेल आणि अमन शेख हे कुटूंबात एकुलते एक असल्याने त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.