
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्स संघटना आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2021 करिता चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स संघटने द्वारे जिल्हा संघाची अजिंक्य पद मैदानी क्रीडा स्पर्धा 9 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, बल्लारपूर येथे सकाळी 9 वाजता आयोजित केली आहे.
या स्पर्धेमध्ये 18 वर्षावरील वरिष्ठ पुरुष व महिला यांना सहभागी होता येईल. विविध अंतराचे धावणे, फेकीचे क्रीडा प्रकार, उडी अशा विविध क्रीडा प्रकारात खेळाडू सहभागी होऊ शकतात.
नोंदणी करिता प्रवेश शुल्क 100 रुपये व जन्माचा दाखला किंवा इयत्ता दहावीचा डिप्लोमा तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी करिता सुरेश अडपेवार, पूर्वा खेरकर यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी कोविड बाबत शासनाने निर्देशित केलेल्या नियमांना अनुसरून मास्क व सामाजिक अंतर याचे पालन करीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटना प्रमुख डॉ. जयस्वाल व सचिव सुरेश अडपेवार यांनी केले आहे.
