केंद्र सरकारच्या पेट्रोल व डीझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आंदोलन

भद्रावती/वरोरा :


पेट्रोल व डीझेल च्या किमंतीत सातत्याने वाढ होत आहे. यास कारणीभुत केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करीत राष्ट्रवादी पदवीधर संघ, जिल्हा चंद्रपुर च्या वतीने शहरातील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
देशात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रोजगारावर मंदीचे सावट आले आहे. व्यापारी व सर्वसामान्यांच्या मिळकतीत घट झाली आहे. आर्थीक अडचणीचा हा काळ आहे. व अशातच केंद्र सरकार पेट्रोल, डीझेल व इंधनाच्या भावात कमालीची वाढ करुन जनतेची प्रत्यक्ष लूट करीत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डीझेलचे भाव कमी होत असतांना आपल्या देशात मात्र भाववाढच होत आहे. केंद्र सरकार पेट्रोल, डीझेलवरील कर कमी करुन भाव नियंत्रणात ठेवू शकते व जनतेची आर्थीक अडचण दुर करु शकते.
केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी व जनतेला महागाईच्या भष्मासुरातून वाचवावे असे आवाहन या आंदोलनातून करण्यात आले आहे.
यावेळी एड. मोरेश्वर टेमुर्डे, प्रा. अशोक पोफळे, विशाल पारखी, रंजनाताई पारशिवे , जयंत टेमुर्डे, मूजम्मिल शेख,अतुल वानखडे, बंडू भोंगळे,अरूण सासरे, विधाते, हासीम अली आदी उपस्थित होते.