करंजी ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात सामाजिक एकता ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार विजयी

प्रतिनिधी….. परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल सामाजिक एकता ग्रामविकास पॅनला जनतेने भरघोस मतांनी विजयी करून
हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू गजाननराव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज करंजी येथिल ७-पैकी ६उमेदवार भरघोस मतांनी विजयी करून काँग्रेस पक्षाचे पारडं जड केले आहे व विरोधात असलेल्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा धुवा उडवुन आपली बाजी मजबूत केली आहे त्याच बरोबर हिमायतनगर तालुक्यात जवळपास ५२ग्रामपचायत पैकी काही बाबुराव समर्थक तर काही नागेश पाटील आष्टीकर यांच्या ताब्यात गेला एकंदरीत हिमायतनगर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारने आपली बाजू मजबूत केल्याचे चित्र निर्माण झाले आहे तरी करंजी येथिल माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा केला व गावाच्या विकासासाठी आम्ही जनतेने दिलेल्या विश्र्वास तोडणार नाही गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सर्वच उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे