
प्रतिनिधि: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३
तिरोडा- पालडोंगरी या गावातील निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे या निवडणुकीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण कुमार पटले यांच्या पॅनल मधील नऊ उमेदवारांपैकी फक्त एक उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यांचे नाव सौ. वर्षाबाई तोलसिंग टेंभरे आहे.
तसेच उर्वरित आठ सदस्य उमेदवारांपैकी सात उमेदवार चंद्रकुमार चौधरी यांच्या पॅनल मधील उमेदवार जिंकून आले आहेत. त्या उमेदवारांचे नाव पुढील प्रमाणे श्री. चंद्रकुमार चौधरी, सौ. रंजनाबाई टेंभरे, सौ. रीनाबाई भास्कर, श्री. चंद्रकांत साबळे श्री. विनोद उईके सौ. वच्छलाबाई मरस्कोल्हे, सौ. येणूबाई मलये हे सात उमेदवार विजयी आहेत.
स्वतंत्र उमेदवारांपैकी दिलीप कुमार मिताराम रहांगडाले हे विजयी झाले आहेत.
गावकऱ्यांनी पंधरा वर्षानंतर सत्ताबदल पूर्णपणे केलेली आहे हे मात्र विशेष. सर्व विजयी उमेदवार गावाचा पूर्णपणे विकास करतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
