कॉल करून युवकाची फसवणूक – ऑनलाइन पेमेंट न करता फोन पे अकाऊंट मधून पैशांची कपात


तिरोडा- आज दि 04 जानेवारी ला मौजा वाडेगाव येथील साई मेडिकल & जनरल स्टोर चे संचालक . फॉर्मासिस्ट मंगेश मधुकर पटले यांना आज दुपारी 9641607404 या नंबर वरून कॉल आला असतांनी यांनी कॉल उचलला पण मेडिकल मध्ये ग्राहक आल्यामुडे त्यांनी कॉल चालू ठेवून ग्राहकाला दवाई दिली . या वेडेमध्ये कॉल चालू होते.
नंतर त्यांनी ग्राहक गेल्यावर कॉल अटेंड केलं तर त्यांना समोरच्या यक्तीने सांगितले की मि फोन पे वरुण कस्टमर एक्सिक्यूटिव बोलत आहे.आपन आपला फोन पे चा बॅलन्स चेक करा.
व जेव्हा यांनी बॅलन्स चेक केलं तर यांच्या अकाऊंट मधून 4100 रुपयांची कपात झालेली होती.
व या प्रकारे त्यांच्या अकाउंट मधून २ ट्रानजेक्शन येनेकरून 3250 व 850 असे दोन व्यवहार झाले होते. पण यांनी ट्रान्सफर न करता व OTP चा पन उपयोग न होता यांचा अकाउंट कपात झाली कशी.
तेव्हा यांना कडला की आपली फसवनुक झाली.
या प्रकारे आज आज वड़ेगाव ला कमित कमी 3 लोकांची फसवणूक झाली.


प्रतिनिधि: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३