ग्राम भजेपार ला ब्युटी पार्लर व मेहंदी लावण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजन

प्रतिनिधी:शैलेश आंबूले ,तिरोडा


तिरोडा: मौजा भजेपार ला ग्राम पंचायत अंतर्गत महिला व मुलींना रोजगार प्रशिक्षण मिडाव या उद्देशाने ग्राम पंचायत भजेपार ला आज एक दिवसीय ब्युटी पार्लर व मेहंदी लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमात गाईड फॉर अनिमल आणि ऍग्रीकल्चर रिसर्च डेवलोपमेंट सोसायटी आमगाव यांनी प्रशिक्षण दिले.या संस्थेचे संचालक मा.एम.बी.मेश्राम ,
व मुख्य प्रशिक्षक म्हणून कल्याणी बिसेंन,भरती हरिनखेडे, विशाल कटरे, अविनाश मेश्राम, माधुरी मेश्राम, आदी होते.
या कार्यक्रमात प्रामुख्याने मा. सरपंच वर्षा ताई पंधरे ,व्ही.जी. भुते ग्रामसेवक , तारेंद्र बिसेंन ग्रा.पंचायत सदस्य, प्रतिमा कुंभरे ताई ग्राम पंचायत सदस्य,छंनु ताई बिसेंन आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मा.एम .बी.मेश्राम यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करून आभार प्रदर्शन केले.
प्रतिनिधी: शैलेश अंबुले तिरोडा तालुका 7769942523