पालडोंगरी ग्रामपंचायत मधे कार्यालयीन वेळेत कुलूपबंद!

प्रतिनिधि : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३

गोंदिया : येथील तिरोडा-तालुक्यामधील पालडोंगरी गावच स्थानिक स्वराज्य संस्था असलेली लोंकांची गावसंसद असलेली ग्रामपंचायत, कार्यालयीन वेळेत कुलूप बंद असल्याचा धक्का देणारा प्रकार उघडकीस आला.

२५ फेब्रुवारी २०२१ गुरुवारला सरपंच चंद्रकुमार बळीराम चौधरी यांनी ग्रा.पं. पालडोंगरी, दुपारी १२.३० वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात गेले. तेंव्हा ग्रामपंचायत कार्यालयालातील दोन्ही परिचर कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच कुलुपबंद ग्रामपंचायत कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला.

यावेळी सरपंच चंद्रकुमार चौधरी, तलाठी एन.ए.गोंडाणे, कोटवार पतिराम रहांगडाले, रूपचंद तुकाराम रहांगडाले, बळीराम गजघाट व विनोद ब्रिजलाल टेंभरे समक्ष पंचनामा केला.

नवनिर्वाचित सरपंच चौधरी यांनी दर दिवशी दोन पैकी एक चपराशी ग्रामपंचायतला हजर असायलाच पाहिजे. जेणेकरून गावातल्या कोण्याही नागरिकांस कोणताही काम असल्यास, त्रास, अडचण होणार नाही आणि ग्राम पंचायत बंदही राहणार नाही. याचे निर्देश दिले.

यावेळी गावकऱ्यांनीही यास दुजोरा व्यक्त करून दररोज ग्राम पंचायत कार्यालयीन वेळेत सुरू असलीच पाहिजे अशी भूमिका घेतली. ज्यामुळे नागरिकांचे कोणतेही कार्य करण्यास सोयीचे होईल. सरपंच यांचे आदेशाचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

उल्लेखनीय असे की, परिचर प्रकाश टेंभेकर यांना फोनवर विचारणा केली. तेंव्हा कोणालाही पूर्वसूचना न देता आम्ही दोघेही भुराटोला येथे कर वसुलीसाठी गेलो असल्याचे सांगितले. असे असले तरी सरपंच यांचे सुशासन चर्चेचा विषय बनत आहे.