
प्रतिनिधी: शैलेश अंबुले तिरोडा 7769942523
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’असे समजले जाते, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींंमधील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवने आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्याच्या अनुषंगाने “शिवनिती संस्था शाखा पालडोंगरी”च्या वतीने दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पालडोंगरी गावचे उपसरपंच विनोदजी उइके, पोलिस पाटील अरविंदजी चौरे ग्रामपंचायत सदस्या सौ येणूबाई मलये,दिलीप जी रहांगडाले,टोलसिंगजी टेंभरे,हौसीलालजी पटले,जि़.प.शाळेचे मुख्याध्यापक बिसेन सर,सहयोगी डुलेशजी रहांगडाले, तंटामुक्त अध्यक्ष गणराजजी रहांगडाले, रोजगार सेवक नरेशजी रहांगडाले,गावातील प्रतिष्ठित नागरिक विजयजी साबळे,घनश्यामजी रहांगडाले, कटरेजी व उपस्थित पाहुण्यांनी आऊसाहेब जिजाऊ, आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.’रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे.शिबिर आयोजित करणारे शिवनिती संस्थेचे कार्यकर्ते तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असा आहे.आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल.असे कौतुक उपसरपंच विनोदजी उइके यांनी अध्यक्षीय भाषणात केले.त्याच प्रकारे उपस्थित इतर पाहुण्यांनी गौरव करित म्हटले की,’रक्तदान शिबिर संयोजकांमुळे समाज सुंदर होत आहे, त्यांच्यातून कार्यकर्त्यांची भावी पिढी घडणार आहे.. शिवनिती संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक विक्रम डोळस यांनी आपले विचार व्यक्त करित सांगितले की,रक्तदान हा शब्द बोलायला खूप सोपा आहे परंतु दुसऱ्या साठी जगणे, हेच खरे जगणे आहे..या माध्यमातून शिवनिती संस्था रक्तदान शिबिर आयोजित करते..
त्याचप्रकारे कार्यक्रमाला मनिष बिसेन सर संस्थेचे सहसचिव सुरेंद्र बघेले,सभासद अविनाश उके,एकनाथ बनकर,सदस्य विभांशू तुरकर,हर्ष मलये,डाॅली रहांगडाले, बिट्टू शेंदरे,संदेश अठराहे,वैभव अंबुले,खिलेन गौतम,तिर्थराज मानकर, विशाल अंबुले,देवेन चौहान,फामेश कटरे,शिवभक्त पारस चर्जे,रतन भजभुजे,यूकुमार वाढई,तुशार सोनेवाने रक्तदाते(जिवनदाते) श्रीकांत ठाकरे, मुकेश गजघाट,देवा पटले सर,किशोर अंबुले,आशिष नागरीकर,शुभम गौतम,दिपक रहेकवार, घनश्याम घरजारे, अविनाश पटले,शिवशंकर ठाकरे, सचिन रहांगडाले, ज्ञानेश्वर किरनापुरे,आदेश मेश्राम, हितेंद्र पटले, महेश रहांगडाले, लोकेश रहांगडाले,विनू अंबुले,यशकुमार टेंभरे,नागेश टेंभरे, गुलशन रहांगडाले, लोकेश कटरे,राकेश बनकर,मोहन रहांगडाले, हेमराज बघेले इत्यादि रक्तदाते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते…
