
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
चंद्रपुर : सरदार पटेल महाविद्यालय तर्फे स्व. शा. पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त 29 जानेवारी 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हेच जीवन दान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे समजल्या जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागलेला आहे.
याच अनुषंगाने तरुणाईच्या मनात रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयात स्व. शांतारामजी पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता पर्यंत करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले यांनी केले आहे.
