शेतकरी कायद्याविरोधात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चक्का जाम आंदोलन

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

शेतकऱ्यांना नको असलेले कायदे शासन थोपवू पाहत आहे त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन जबरदस्ती कायद्याची उपयोगिता पटवून देण्याचा अट्टाहास , शेतकरी नेत्यांना दिल्लीत जाण्यापासून थांबविण्यासाठी रस्त्यावर खिळे खोवणे, मोठं मोठे बरिकेटस् लाऊन , सीमेला जणू देशाच्या सीमेचे ,छावणीचे स्वरूप देऊन रोखणे, शेतकरीवर्गाची गळचेपी करणे आणि वेगवेगळ्या नावाने शेतकरयांना अरोपित करणे या निषेधार्थ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे आज दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी आनंदवन चौक वरोरा या ठिकाणी लाक्षणिक चक्का जाम करण्यात आला या मध्ये असंख्य कार्यकर्ते मंडळी सामील होऊन ,सरकारच्या या गळचेपी विरोधात ,निषेध नोंदवून शेतकरी संपला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वरोरा