जि.प.विद्यार्थ्यांचा थेट अमेरिकेत संवाद,वेध प्रतिष्ठान, काटोल-नरखेड चा ‘ग्रेट भेट’ उपक्रम

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

पर्यावरणतज्ज्ञ डॉ.संगिता तोडमल यांच्याशी संवाद

काटोल-नरखेड तालुक्यातील १० शाळेतील १०० विद्यार्थ्यांचा सहभाग

तालुका प्रतिनिधी/१३फेब्रुवारी
काटोल – वेध प्रतिष्ठान, काटोल-नरखेड तर्फे आयोजित ‘ग्रेट भेट’ उपक्रमांतर्गत अमेरिका येथील पर्यावरणतज्ज्ञ डॉ. संगिता तोडमल यांच्याशी काटोल तालुक्यातील झिलपा, इसापूर, वाघोडा, चंदनपारडी, दिग्रस,आलागोंदी व नरखेड तालुक्यातील पेठमुक्तापुर, थुगांव (निपाणी), मोहगांव(भदाडे), खैरगाव या दहा जि.प. शाळेतील १०० विद्यार्थ्याशी झूम वेबिनारद्वारे संवाद साधला.
वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे तेव्हा सर्वानी वृक्षसंवर्धन करावे.वैयक्तिक स्वच्छतेसोबच सार्वजनिक स्वच्छता ठेवावी.शालेय जीवनात लागलेल्या चांगल्या सवयी देशविकासाकरिता प्रेरणादायी असतात असे प्रतिपादन डॉ.संगिता तोडमल यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कोरोना काळातील शिक्षण, पर्यावरण, व्यापार, शेती, हवामान, राहणीमान, घराची रचना, जैवविवधता, पर्यावरण विषयक उपक्रम, आरोग्य, प्राणी संवर्धन, वैज्ञानिक व तंत्रज्ञान प्रगती इत्यादी विषयावर प्रश्न विचारली.
वेबिनारचे प्रास्ताविक वेध नरखेड समन्वयक धनंजय पकडे, संचालन ‘ग्रेट भेट’ उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे तर तांत्रिक सहायक कमलेश सोनकुसळे तर आभार प्रदर्शन विवेक बोरकर यांनी मानले.सदर वेबिनारकरिता वेध काटोल समन्वयक मारोती मुरके, रोशन सावरकर, हरेशकुमार खैरे, दिनेश डवंगे,राजेंद्र बोरकर व घनश्याम भडांगे यांनी परीश्रम घेतले.