
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर राज्य परीवाहन महामंडळाने ग्रामीन भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती,त्यामुळे ग्रामीन भागातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली .
आता शाळा काॅलेज सुरू झाल्याने माढेळी मार्गावरच्या बसफेऱ्या वाढविण्याची मागणी व बंद असलेली माढेळी-केळी-नागरी हि बस सेवा पुर्वरीत तातडीने सुरू करावी अशी मागणी शुभम चिमूरकर , संकेत वानखेडे,विशाल बरडे, अभय महल्ले, वैभव शेंडे , नयन डोंगरे,चेतन मोहितकर ,हर्षल वाढई इत्यादी युवकांनी केली आहे .
दुपारची ची केळी मार्गे नागरी बस सेवा हि अत्यंत महत्वाची आहे ,गेल्या चार महिण्यापासुन हि बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्याचे -मोठे हाल होत आहेत .
माढेळी-केळी-नागरी मार्गावर सध्या १२ ची व ५:३० ची बस सेवा चालु आहे, त्यात -माढेळी-वाघनख-येवती-केळी ,नागरी व इत्यादी गावचे विद्यार्थी या मार्गाने प्रवास करतात ,या विद्यार्थ्याना बंद असलेल्या बसेस मुळे आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे .
