


प्रतिनिधी:जीवन तोगरे,जिवती
जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
जिवती :- येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
या वेळी चंद्रपूर परिषेदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके यांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 50 टक्के आरक्षण चा फायदा घेत महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज व्हावं असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगितले. या वेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, जमीर भाई जिल्हाउपाध्यक्ष, मुनीर भाई अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष, जेष्ठ नेते ममताजी जाधव, कोरपना तालुक्यातील मेजर बंडूजी कुमरे, युवा नेते संजय सोयाम, लक्ष्मण कुळसंगे, संदीप पंधरे, प्रकाश शेडमाके, गोंडपिपरी येथील पिसाजी कुळमेथे, प्रदीप कुळमेथे, दिपक पेंदोर, सतलूबाई जुमनाके माजी जिल्हा परिषद सदस्या, सुधाबाई सिडाम माजी जिल्हा परिषद सदस्या, राधाताई आत्राम, कुंदाबाई सलामे, अरुणाताई पेंदोर, गिरजाबाई परचाके, कालिनाताई उईके, संगीताताई आत्राम, वच्छलाबाई गेडाम, रूपाबाई कुळसंगे, मनीषा गेडाम, पूजा आत्राम, वनिता पेंदोर उपस्थित होते
