

प्रतिनिधी:ऊर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
आज दिनांक 20 जानेवारी 2021 ला स्थानिक पंचशील चौक परिसरातील एका ज्वलंत मुद्याला घेऊन आम आदमी पार्टीने धरणे आंदोलन केले. मुद्दा ह्या प्रकारे की स्थानिक पंचशील चौकांमध्ये वाहत असलेल्या नाल्यावर पुल आहे त्याला खूप मोठा भगदाड पडला आहे आणि त्या भगदाड पडल्यामुळे मागच्या दोन तीन महिन्यापासून तिथे पाच ते सहा एक्सीडेंट झाले आहे. परिसरातील नागरिकांची आम आदमी पार्टी कडे तक्रार आल्यावर दखल घेऊन धरने आंदोलन करण्यात आले. यामुळे होत असलेल्या अपघाताची दखल मनपा प्रशासनाने घ्यावी व जीवितहानी टाळावी ह्या कड़े दखल घ्यावी ही मागणी लाऊन धरली .
त्या अनुषंगाने आम आदमी पार्टी ने आज धरणे आंदोलन केले .या धरणे आंदोलनासाठी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे तसेच शहर अध्यक्ष प्रशांत प्रभाकर येरने यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये उपस्थित जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज भवरलालजी सोनी चंद्रपूर महानगर संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर, हुमायु अली , शहर सहसयोंजक सिकंदर सागोरे , दिलीप भाऊ तेलंग , अशोक भाऊ आनंदे , राजु कुडे ,योगेश आपटे सहसयोजक, मनोज मीश्रा व परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या दोन दिवसांमध्ये जर हा खड्डा दुरूस्त झाला नाही तर येत्या दोन दिवसानंतर पुढे आणखी तीव्र आंदोलन करू असे आम आदमी पार्टीने परिसरातील जनतेला सोबत घेऊन आश्वासन दिले महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे त्यानुषंगाने यापुढे पण आम्ही असेच सामान्य माणसाची सुरक्षेचे प्रश्न मग ते बिजली, पाणी , शिक्षा ,स्वास्थ ,रोजगार, किंवा सुरक्षा असा कुठलाही मुद्दा असो त्या मुद्द्याला हात घालणार असे आवाहन आम आदमी पार्टी, चंद्रपुर जिल्हा , महानगर करीत आहे , धन्यवाद !
विनम्र,
राजेश शंकर चेडगुलवार
8055589696
आम आदमी पार्टी,
चंद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख
