NSUI चंद्रपुर तर्फे शहरातील विविध कॉलेज मध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने व सिगनीचर कंपेनिंग

मोदी सरकारच्या तरुण आणि देशविरोधी धोरणाखाली आणले गेली अग्निपथ योजनेच्या विरोधात NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या नेतृत्वात चंद्रपुर, महाराष्ट्र येथे आंदोलन।

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरूणांचे भविष्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल तीव्र रोष निर्माण झाला आहे. मोदी सरकारने ही योजना तातडीने वापस घेऊन नवजवानांना त्यांच्या भविष्याची खात्री देणारी पूर्वीचीच सैन्य भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी चंद्रपुर NSUI तर्फे NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व NSUI अध्यक्ष शफ़क़ शेख यांच्या नेतृत्वात चंद्रपुर येथे असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थिति मध्ये निदर्शने करण्यात आली.
व चंद्रपुर येथील सरदार पटेल महाविधालय येथे सिगनीचर कंपेनिंग करून मोदी सरकार चा निषेध नोंदविन्यात आला

या वेळेस NSUI चे विधानसभा अध्यक्ष शफ़क़ शेख, युवा नेते याक़ूब पठान, प्रतीक नलाला, हिमांशु आवळे , उमेश बरडे, स्वाति सिंह, प्रीति यादव, नावेद शेख़ व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते!