हदगाव पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव

आज 8 मार्च पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव राख साहेब यांनी पोलीस स्टेशन मध्ये कोरोना चे सर्व नियम पाळून विविध क्षेत्रातील महिलांचे स्वागत सत्कार करून जागतिक महिला दिन साजरा केला. या वेळी उपस्थित ओम शांती च्या बहनजी, धुळे मॅडम, लताताई फाळके, राऊळ मॅडम, रूपा पाटील, कल्पना देशमुख, वाठोरे ताई, हापसे ताई, हटकर ताई, पूजा राऊत, संजीवनी राऊत तसेच अनेक शालेय विद्यार्थीनि सह अनेक महिला मुली उपस्थित होत्या या कार्यक्रमात धुळे मॅडम, राऊल मॅडम, लताताई फाळके, पत्रकार लाहोटी, पत्रकार गजानन गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना लताताई फाळके म्हणाल्या की, “80- 90 च्या दशकांमध्ये हुंड्यासाठी सुनेला जाळले किंवा फाशी दिली अशा बातम्या दररोज ऐकण्यात येत होत्या परंतु आज फक्त फरक इतकाच आहे की आज घरात नाही तर बाहेर मुली महिलांना असंख्य अन्याय-अत्याचार आणि प्रसंगी हत्या हे प्रकार राजरोस सुरू आहेत म्हणजे काळ कुठलाही असला तरी बळी मात्र स्त्रीचा च जात आहे हे कुठेतरी थांबले पाहिज आणि त्यासाठी स्त्रीला आत्मविश्वासाने येणार्‍या परिस्थिती शी सामना करण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे”.
पोलीस निरीक्षक राख साहेब यांनी महिलांची कुठलीही तक्रार असेल तर आम्ही सर्वतोपरी
सहकार्य करू, बिनधास्त रहा असे महिला आणि शालेय मुलीना आश्वासन दिले.
मोरे साहेबांनी सर्वांचे आभार मानले. तर गणेश गिरबिडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.