

प्रतिनिधी:जीवन तोगरे,जिवती
.
जिवती : दि.१२ मार्च २०२१ शुक्रवार जिवती येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी करण्यात आले.
जिवती शहरातील गोंडीयन समाज व सामाजिक संघटनाच्या वतीने शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा १८८ व जयंती शेडमाके चौक येथे शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक पूजास्थळी माजी नगराध्यक्ष, तथा नगरसेवक तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तिरु.गजानन गोदरू पाटील जुमनाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण
करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शनात वीर बाबुराव शेडमाके यांनी अल्प आयुष्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला. व संपूर्ण जिवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच संपूर्ण आदिवासी समजा एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष, तथा नगरसेवक तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तिरु.गजानन पाटील जुमनाके, संचालक कृषी उत्पन्नबाजार समिती कोरपना- जिवाती तिरु.ममताजी जधाव, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मेहबुबाभाई, भाजावा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोविंदभाऊ ठोगरे, नगरसेवक, अमरभाऊ राठोड, नगरसेवक मारोती बेल्लाळे, माजी सभापती भीमराव मेश्राम, डॉ.अंकुशजी गोतवाळे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते रमेश पुरी, सामाजिक युवा कार्यकर्ते विजय गोतावाळे, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, ज्येष्ठ आदिवासी नेते मारुजी नैताम, शामराव गेडाम, भीमराव पाटील जुमनाके, सुखालाल कोटनाके, बारीकराव कोटनाके, युवा नेते कंटू कोटनाके, जंगू वेट्टी, केशव कुमरे, केशव कोहचाळे, राजकुमार मंगाम, सत्तरभाई शेख, मातीन शेख, सूत्रसंचालन लिंगोराव सोयाम सर, प्रास्ताविक प्रा.लक्ष्मण मंगाम अध्यक्ष,मुळनिवासी एकता संघर्ष समिती तर आभार कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ यांनी मानले. संजू मडावी, संदीप मेश्राम, गोविंद कोटनाके, अविनाश मेश्राम, रवी जुमनाके, विजय जुमनाके व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
