

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
भोकर तालुक्यातील मौजे पिंपलढव व मौजे जाक्कापुर येथील काही नागरिकांनी महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स प्रा ली कढुन 2013 मध्ये घर बांधणी करिता एक लाख पन्नास हाजार गृह कर्ज घेतले होते त्याची परतफेड मुदत 5 वर्षा करिता सुलभ व्याजा सह सहामाही या पद्धतीने काही अटी सह उलगडा करून त्यांना गृहकर्ज देण्यात आलेले होते परंतु काही कालावधी नंतर त्या ग्रहकर्जाचा परतावा न केल्यामुळे कंपनीने सांबंधित कर्जदाराला नोटिसा देऊन ही त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही त्यामुळे कंपनीने टोकाचे पाऊल उचलत मा जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयीन आदेशानुसार भोकर येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी आणि पोलीस बंदोबस्तात थकीत कर्जदार यांच्या गहाण मालमत्ता जप्त करण्यात आली यावेळी महिंद्रा फायनान्स चे प्राधिकृत जप्ती अधिकारी ऍड मोईज पाशा, विभागीय अधिकारी सचिन डाकरे, जिल्हा प्रबंधक श्याम घोडेकर हिमायतनगर शाखा अधिकारी गोविंद शिंदे आदी अनेक अधिकारी उपस्थित होते
