इंडिया मेगा अग्रॉ लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर येथे कची हळद खरीदी करण्यास कंपनीने केली सुरुवात जिल्ह्यसह तालुक्यातील शेतकऱ्यानी हळद द्यावी

प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर

नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या इंडिया मेगा अग्रॉ लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर येथे शेतकऱ्यासाठी कंपनीने जिल्ह्यसह तालुक्यातील शेतकऱ्याना खूष खबर दिली आहे
कंपनीने शेतकऱ्याच्या हितासाठी मोठे पाऊल उचलले असून शेतकऱ्यानी यंदा मोठ्या प्रमाणात हळद या पिकाची लागवड केली
आणि इंडिया मेगा अग्रॉ लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे कंपनीने शेतकऱ्याच्या शेतातील कच्छी हळद खरीदी करत आहे
शेतकऱ्यानी शेतातील हळद काढल्या नंतर त्या हळदीला शिजविने, कडक उन्हात वाळू घालणे, ढोल करणे, मार्केट मध्ये घेवून जाणे असी एका महिन्याची मेहनत शेतकरी वाया घालतो व शेतकऱ्यांना उत्पन्न होऊन ही घट होते आणि तोटा सहन करावा लागत आहे
तीस दिवस लागणारी हळद प्रकिया कंपनीने तीन दिवसात यशस्वी रित्या पूर्ण केली आहे शेतकऱ्याच्या हितासाठी कंपनी कची हळद डायरेक्ट योग्य दरात खरीदी करत आहे
जिल्ह्यसह तालुक्यातील शेतकऱ्याना मोठा लाभ व फायदा होणार असल्याने या कंपनीने या पूर्वी सुध्दा सोयाबीन, हरबरा,ज्वारी,गहू,शेतकऱ्या मार्फत डायरेक्ट खरीदी केल्यामुळे शेतकऱ्याला मोठा लाभ झाला आहे
शेतकऱ्यानी कच्छी हळद कंपनीला देऊन उत्पन्न वाढवुन घ्यावेत अशी चर्चा जनसामान्य माणसातुन होत आहे शेतकरी बांधवांनी लवकर हळद काढून कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी कची हळद योग्य दरात कंपनीला द्यावी