
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातिल कामारी परिसरातुन दररोज अवैध रित्या रेती उपसा होत असुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतीत जमा होत असला तरी महसूल प्रशासन या रेती माफियांवर कार्यवाही करत नसल्यामुळे रात्री अंधारात चोरी होत असलेली रेती आजघडीला भरदिवसा उजेडात चोरी केली जात आहे त्यामूळे पर्यावरणाला हि धोका निर्माण होत असल्यामुळे परिसरातील पर्यावरण प्रेमी नी अतिशय नाराजी व्यक्त करत आहे.
कामारी हे गाव तालुक्यापासून १० की.मी. अंतरावर असल्यामुळे या वाळू माफियांसाठी हि एक संधी समजुन कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता सर्रासपने आता महसूल प्रशासनाला जणू चॅलेंज करून दिवसा उजेडात रेती उत्खनन होत आहे त्यामूळे नदिपात्र उघडे पडून त्याचे सौंदर्य धोक्यात आले तरी महुसुल प्रशासन अजुन झोपेत कसा असा खडा सवाल परिसरातील पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.
नुकतीच कामारी परीसरात महसुल पथकाने धडाडीची कार्यवाही करून रेती माफियांना धसका दिला मात्र कुपटी परीसरात या पथकाची कार्यवाही कधी होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
