SBI बँक मधून दलाल हद्दपार…. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे आठ दिवसात निकाली काढणार

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


शाखाधिकारी काकांडे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन

हिमायतनगर| भारतीय स्टेट बैंकेच्या चालढकलपणामुळं 4 महिन्यापासून कृषी कर्जाच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळं बैन्केसमोर शेतकरी महिला पुरुषांच्या रांगा लागत असून, कनेक्टिव्हिटी नसल्याने आणि ऑडिट चालू असल्याच्या नावाखाली कर्ज प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगून अधिकारी हातवर करत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन मागणी करताच बैन्केतून दलाल हद्दपार झाले असून, शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाच्या पेंडिंग राहिलेल्या ३७० हुन अधिक फायली आठ दिवसात निकाली काढू असे आश्वासन SBI चे शाखाधीकारी स्वप्नील काकांडे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळ दिले आहे.

शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कृषी कर्जाच्या फायली दाखल केल्या आहेत. त्या फायलींना प्रलंबित ठेऊन अधिकारी चालढकल करत दिवस पुढे ढकलत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना दिवसभराची कामे सोडून बैन्केसमोर ताटकळत बसावे लागत आहेत. हा प्रकार काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल मादसवार यांच्या लक्षात आणून दिला. यावेळी त्यांनी शाखाधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. तसेच आमदार खासदार महोदयांना याबाबत अवगत करून देऊन शेतकऱ्यांची समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रलंबित फायली मार्गी लावून कर्जपुरवठा करण्यात यावा. दलालांची कामे बंद करून गरजू शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर दि.२८ सोमवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने करंज प्रकरणाचे काय झाले अद्याप निकालाची का काढण्यात आले नाही या संदर्भात भेट घेतली. यावेळी प्रथमतः शाखाधिकाऱ्यानी उर्वरित फायली रब्बीच्या प्रकरणात घेण्याचे सांगताच पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली. तेंव्हा शाखाधिकारी स्वप्नील काकांडे, फिल्ड ऑफिसर जितेंद्र सिंह यांनी पेंडिंग खरीप हंगामातील कृषी कर्जाच्या फायली येत्या आठ दिवसात निकाली काढू त्यानंतर रब्बीच्या कर्जाचे प्रकरण घेऊ असे आश्वासन दिले. तसेच बैंकेत आता कोणीही दलाल राहिला नाही, केवळ कर्मचाऱ्यांची रिक्त जागा असल्यामुळे कर्ज प्रकरने प्रलंबित होते असे त्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी प्रथमतः अत्यंत गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन सर्व शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे निकाली काढाव्यात अशी आग्रही मागणी केली. तसेच मयत शेतकऱ्यास कर्ज मिळाले असते आणि कर्ज माफी मंजुरी झाली असती तर शेतकऱ्याची आत्महत्या थांबली असती असे बैंक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले. तर अनिल भोरे यांनी शेतकऱ्यांचे प्रकरणी निकाली न निघाल्यास बैन्केसमोर टेन्ट लावून शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीप्रमाणे आंदोलन उभारणार असल्याचे इशारा दिला. यावेळी सर्व पत्रकारांनी बैन्केतून दलाल हद्दपार केल्याबद्दल शाखाधिकारी यांचेसह फिल्ड ऑफिसरची अभिनंदन केले. यावेळी पत्रकार अनिल भोरे, मनोज पाटील, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, पाशा खतीब, शुद्धोधन हनवते, नागेश शिंदे, सत्यव्रत ढोले, सारंग मिराशे, रामदास वाळके, आदींसह अनेक महिला – पुरुष शेतकऱ्यांची उपस्थिती होती.