
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
नांदेड : देशात तसेच जगात कोरोना महामारीने जवळपास वर्षापासून थैमान घातले आहे, या काळात कोरोनाच्या अक्राळविक्राळ रुपासमोर सर्व यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक सामाजिक संघटनेचे जगभरातून अनेक हात पुढे आले , त्याप्रमाणेच विश्व हिंदू परिषद नांदेड जिल्ह्यातर्फे सुद्धा रुग्णांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना डबे वाटप, रक्तदान कॅम्प आयोजन , वेळोवेळी रुग्णांना बेड,औषधे साठी मदत, योग्य मार्गदर्शन करणे असे अनेक कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जिल्हामंत्री शशिकांत पाटील यांनी राबविले, याच कार्याचा अहवाल पाहून आर्य चाणक्य सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा बेरलीकर यांच्याकडून नांदेडरत्न पुरस्कार शशिकांत पाटील यांना देण्यात आला, असे सामाजिक कार्य सर्वांनी राबविले पाहिजे असे मत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार सोबत होता.हा पुरस्कार तयंची पत्नी सो प्रेरणा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला
