
हिमायतनगर( तालुका प्रतिनिधी ):परमेश्वर सूर्यवंशी
येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी दि.13 जुलै रोजी हिमायतनगर शहरात विना परवाना मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या 160 वाहनांची तपासणी केली त्यात 57 जणास 22200 रुपयांचा दंड लावला त्यामुळे आपण दादा,भाई, बॉस अशा ? फॅन्सी व सजावटी च्या नंबर प्लेट आपल्या गाडी वर लावल्यास आपल्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते त्यासाठी आपण आपल्या जवळ आपल्या गाडीचे कागदपत्रे ठेऊन हिमायतनगर पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर पोलिस स्टेशन तर्फे करण्यात येत आहे
कोरोणा सारख्या महाभयंकर बिमारीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलीस स्टेशन तर्फे शहरात एक मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये शहरात विना परवाना मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे त्यामध्ये जो कोणी आपल्या गाडीचे कागदपत्रे व फॅन्सी नंबर , व अनेक दुचाकीस्वारांनी त्यांचे मोटार सायकल सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णर्कश्य आवाज करणाऱ्या मोटर सायकल घेऊन ते नियमाचे उल्लंघन करत फिरत आहेत त्यांच्या विरोधात शहरातील पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम चालू केली आहे शहरात अगोदरच मोटार सायकल गाड्या चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी एक नामी शक्कल लढवून शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची चेकिंग सुरू केली आहे त्या मोहिमेची सुरुवात दिनांक 13 जुलै 2021 केली पहिल्याच दिवशी त्यांनी व त्यांच्या सर्व टीम ने 160 वाहनांची चेकिंग केली त्यामध्ये 57 वाहना वर कार्यवाही करत त्यांच्या कडून बावीस हजार दोनशे रुपयांचा दंड त्यांनी वसूल करून घेतला ही मोहीम यापुढे पण चालू राहणार आहे त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी आपण घराबाहेर पडताना आपल्या गाडीचे कागदपत्र आर,सी बुक वर लायसन हे नियमित जवळ बाळगावे व नियमाचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी यावेळी केले आहे
या पथक मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब, पोलीस निरीक्षक परसराम देवकते , ए.एस आय. कांबळे,बीड जमादार लपशेटवार साहेब, हेमंत चोले, राठोड, पी. सी. कुलकर्णी सह आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते
