
…
परमेश्वर सुर्यवंशी..,.. प्रतिनिधी
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची विजेच्या अनियमिततेमुळे वाताहत होत आहे, त्यातच विज रोहित्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणचा विज पुरवठा बंद आहे. तात्काळ विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिआमदार बाबुराव पाटिल कोहळीकर यांनी मुख्य अभियंता पडळकर, अधिक्षक अभियंता यांना निवेदन देवुन लाईटची समस्या सोडविण्याची मागणी केली त्याचबरोबर गेल्या काही दिवसा पासुन शेतकरी राजा याना विजपुरठा वेळेवर होत नसल्यामुळे रबी पिकाला त्याचा परिणाम होताना दिसत आहे आज जवळपास चना गहु मका बाजरी इतर देखिल पिक आहेत जर त्या पिकाला वेळेवर पाणी नाही सोडले तर पाण्यावाचुन सूकून जाईल आणि शेतकर्याचे आर्थिक नुकसान होईल त्यामूळे शेतकर्याला वेळेवर विजपुरवठा करण्यात यावा व रात्रीचा पुरवठा खंडीत करुन दिवसा पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी बाबुराव कदम कोव्होळीकर आक्रमक झाले आहे जर का आम्हच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही उघ्र आदोलन करु आशा इशारा यावेळी पत्रकारशी बोलाताना दिला आहे.
