ग्रामपंचायत कार्यालय सोनारी येथे शिवस्वराज्यदिन उत्सव साजरा

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


आज ६ जूनला २०२१ सकाळी ९ वाजता सोनारी ता हिमायतनगर ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी


उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे आसे प्रतिपादन नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस व नवनिर्वाचित सरपंच सुधाकर पाटील सोनारीकर यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. सोनारी नगरीतील या कार्यक्रमाला नवनिर्वाचित सरपंच सुधाकर पाटील सोनारीकर.
उप सरपंच सय्यद युनूस भाई ग्रामसेवक साहेब
रोजगार हामी चे सदस्य मधुकर पाटील
मा सरपंच रामदास कदम पाटील
भाजपा टिम मोदी सपोर्टर संघ ता अध्यक्ष विनोद दुर्गेकर सोनारीकर व सोनारी ग्रामपंचायत सदस्य
प्रतिनिधी.गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयघोष करण्यात आला,


प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी