भारोसा येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे थाटात उदघाटन.

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना

कोरपना:- तालुक्याचे शेवटच्या टोकावर असलेल्या भारोसा गावात गोंडीयन संस्कृती संरक्षण समिती च्या वतीने 1857 चे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 मार्च 2021 ला मान्यवरांच्या उपस्थितीत शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे उदघाटन थाटात करण्यात आले.

कार्यक्रम नियोजन नुसार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वीर बाबुराव शेडमाके यांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर सल्लागागरा शक्ती स्थळावर भूमक गजानन कुळमेथे, दिगंबर मराठे यांच्या हस्ते मूठपूजा व गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मिरवणूकिचे राष्ट्रीय शहीदवीर बाबुराव शेडमाके चौक येथे विसर्जन करून सभेत रूपांतर करण्यात आले. भव्य सभेला तसेच पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नियोजित मान्यवर अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी उदघाटक म्हणून विजयराव परचाके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा, विशेष अतिथी गजानन पाटील जुमनाके कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, माजी सभापती मडावी साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेश कोडापे स. शि. राजूरा, संजय सोयाम माथा, भगवान परचाके इरई, लक्ष्मण कुळसंगे मांडवा, संदीप पंधरे आवाळपूर, चंदाताई गेडाम एकोडी, देवराव निमकर सरपंच ग्रामपंचायत भारोसा, सतीश गेडाम पोलीस पाटील, देवराव पावडे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, वंदनाताई परचाके ग्रामपंचायत सदस्या, शीतल ढवस, कल्पना आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पुष्पमाला व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आयोजित सभेला मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष वामन तोडासे, उपाध्यक्ष रामदास तोडासे, सचिव सुनील तोडासे, सहसचिव समीर गेडाम, कोषाध्यक्ष अशोक तोडासे, कार्याध्यक्ष सचिन किन्नाके व भारोसा येथील आयोजन समितीने घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडीयन संस्कृती समितीचे सचिव संजय तोडासे यांनी केले तर सूत्रसंचालन मनीषा समीर गेडाम व आभार प्रदर्शन निलेश गेडाम यांनी केले.