
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे, शेगाव
वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळ असलेल्या अर्जुनी- कोकेवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाघाची दहशत सुरू हकती ,हा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या भागात वाघांचा तसेच जंगली जनावरांचा वावर जास्त प्रमाणात असतो. याच भागातील एका शेत शिवारात एक वाघाचा मृतदेह असल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला .दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता असल्याचे कळते.
