


बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने
दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ‘स्टॉप डायरीया’ अभियान हाती घेतले असून, १ जुलैपासून या अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनोखे उपक्रम, अभियान राबविले जात आहे. पावसाळ्यात सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘स्टॉप डायरीया’ अभियान राबविण्यात येत आहे.
जलजन्य आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात “स्टॉप डायरीया” हे अभियान राबविण्यात येत असून.त्या अनुषंगाने वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव बु येथे गावांमध्ये विद्यार्थी व शिक्षक पालक यांनी “स्टॉप डायरीया” जनजागृती करून गावातील नागरिकांना
शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाही. याबाबत या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली .
वेळी या कार्यक्रमाला वर्ग ५ वी ते 12 वी चे विद्यार्थी पालक
विद्यालयाचे प्राचार्य डि.एम.खर्चे, पर्यवेक्षक आर.आयु.काटोले, प्राध्यापक संतोष आंडगे, प्राध्यापक सुनील काळे, प्राध्यापक सुनील काळबांडे, प्राध्यापक नरेंद्र दुधे, प्राध्यापक जगदीश वाळुकर, प्राध्यापक अमोल माने,
डी. एस. गावंडे,आर. यु. वैद्य,जे.वाय.बरगे,एस. एन. पावडे
जी. जी. निरटवाड, एस. एस. मामीडवार ,कु. एम. डी. रावते,,
कु. एस. एस. बिडवई
के. एम. दुलेवाड,एस. एन सुबलवाड
आर. एस. घुसे,लीपीक ए. पी. हिंगाडे
लिपीक
कु. पी. जी. मस्के,
एस. एस. मेहेत्रे,एस. वाय. शेंडे
सेवक व्ही. टी. बोबडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
