

प्रतिनिधी:प्रशांत विजय बदकी,वरोरा
बोर्डा गावाच्या परिसरात मागील काही दिवसापासून अवैधरित्या रेती तस्करी सुरू आहे .वरोरा तालुक्यातील रेती घाट लिलाव झाला असल्याने रेती चे भाव कमी झाले आहे .तरी बोर्डा,जामगाव,दिंडोदा ,डोंगरगाव या परिसरातील महसूल विभागाच्या तसेच वन विभागाच्या हद्दीतुन रेती तस्करी जोमात सुरू आहे परंतु यावर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.काल सकाळी एका महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर पकडले खरे परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता 15 हजार रुपये घेत ट्रॅक्टर परस्पर सोडल्याची चर्चा आहे .
या प्रकरणी माध्यमाच्या प्रतिनिधी नि संबंधित अधिकाऱ्याला कारवाई ची माहिती मागितली असता माहीती देण्यास टाळाटाळ करण्यात आली .
