
प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा वाढता प्रभाव पाहता राज्यातील अनेक जिल्हे लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर आहेत. अनेक शहरात सुरू ही झाले आहे.
आज नाशिक मध्ये जिल्हापरिषदेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सध्यातरी लॉक डाऊन ची गरज नसल्याचे सांगितले. पण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे आणि जर परिस्थितीत सुधार झाला नाही तर लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही अशी काहीशी परिस्थिती आहे आहे.नाशिक माध्ये रोज 2 ते अडीच हजार रुग्ण सापडत आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री स्वतः सायंकाळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर उतरले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावून लॉक डाऊन संदर्भात अहवाल मागवला.
