
परमेश्वर सुर्यवंशी
मा. आमदार आष्टीकर यांच्या प्रयत्नातून कोळी गावासाठी ६० ते ७० लक्ष रुपयांचा निधी ऐन विधानसभा निवडणुकिच्या वेळी मंजुर झाला होता काही कारणास्तव तो निधी अखर्चित राहीला होता या कालावधीत विधानसभा निवडणुकीत आष्टीकर यांना पराभव पत्करावा लागला होता पराभुत झाल्यानंतर ही पराभवाची सल मनामध्ये न ठेवता पुर्ण ताकदीनिशी अपुर्ण राहीलेली विकास कामे पुर्ण कशी होतील याचा परिपुर्ण अभ्यास करून आष्टीकर यांनी त्यांचे अंत्यंत विश्वासू असलेले तळणी येथिल गुत्तेदार राजेंद्र जाधव यांना या कामाची सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने राजेंद्र जाधव यांनी प्रथमतः कोळी येथिल पेव्हर ब्लॉगचे रखडलेले काम ग्रामपंचायत व कोळी वाशियांच्या सहकार्याने पुर्णत्वास नेले
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कोळी गावासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पेव्हर ब्लॉक चे काम अंतिम टप्प्यात असून अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने कोळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असल्याचे कोळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय कदम यांनी सांगितले.
हदगाव बाळापूर या मार्गावर असलेल्या कोळी या गावातील रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती.
तत्कालीन आमदार आष्टीकर यांचेकडे प्रविण जगताप आशिष भुजबळ सह ग्रामपंचायत कार्यालय व कोळी ग्रामस्थांच्या वतीने या रस्त्याचे काम करण्यात यावे, त्यासाठी निधी मिळवून दयावा अशी मागणी केली होती. त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून मा. आमदार नागेश पाटील यांनी सन २०१९-२० इतर ग्रामविकास कार्यक्रम २५-१५ योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी मिळवून दिला. तदनंतर कोळी येथे आष्टीकर यांचे हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने कोळी ग्रामस्थांचा रस्ता प्रश्न मार्गी लागणार असुन ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे,सरपंच श्री संजय कदम यांनी कोळी ग्रामस्थाच्या वतीने मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर व या कामाचे गुत्तेदार राजेंद्र जाधव तळणीकर यांचे आभार मानले आहेत
