
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपुर
संपूर्ण राज्यात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटे मुळे मोठ्या प्रमाणात रुगणांची संख्या वाढली असून प्रचंड प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
एका अर्थाने राज्यावर आलेल्या संकटा समयी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आव्हान राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व्हेसर्वा
आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनील गव्हाणे यांनी आव्हान केले. रक्तदाना संबंधाने केलेल्या आव्हाना नुसार आज वरोरा नाका चंद्रपूर येथील पत्रकार भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात ५० हुन अधिक राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
