धक्कादायक : वांझरी गावामध्ये 5 दिवसांत तब्बल 85 कोरोना पाॅझीटिव्ह

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर

16/04/2021
पांढरकवडा

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे कडक निर्बंध लावले जात आहे व 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लावला असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढता आलेख दिसत आहे. तर केळापुर तालुक्यातील वांझरी गाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनत चालले आहे. गेल्या काही दिवसात या गावात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाल्याचे दिसून आले, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, वांझरी मार्फत चालू असलेल्या कोरोना चाचणी मध्ये दररोज रुग्णाची भर पडत आहे.
मागील 5 दिवसांमध्ये गावात तब्बल 85 जण कोरोना पाॅझीटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे व आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली असून मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाॅझीटिव्ह रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासन हादरले आहे, व सर्व गावकर्‍यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.