निधनवार्ता:ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

21/04/2021
पांढरकवडा

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

पांढरकवडा शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रसाद नावलेकर यांचे आज अचानक निधन झाले.ही वार्ता प्रचंड प्रमाणात दुःख देणारी असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.अर्बन बॅंकेत कर्तव्यदक्ष कर्मचारी अशी त्यांची ओळख असून ग्राहक प्रहार संघटनेचे जाळं सचिव होते, काळाने घाव घातला, आज 7:30 ला यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.