हजारो सापांना जीवदान देणारा हदगाव चा अवलिया बबनराव भुसारे

लता फाळके /हदगाव

साप साप म्हणलं की सर्वांच्याच मनात धडकी भरते,अशाच एका धामण जातीच्या अंदाजे 8 फूट सापाला सर्पमित्र बबन भुसारे यांनी मोठ्या धाडसाने आणि आपल्या कौशल्याने पकडले. झालं असं की, हदगाव शहरामध्ये असलेल्या माहेश्वरी भवन च्या पाठीमागे असलेल्या परिसरात लहान मुलं खेळत असताना साप साप म्हणत घरामध्ये धावत आली तेव्हा घरातून जेष्ठ माणस बाहेर आली आणि पाहतात तर काय एक आठ फूट लांबीचा साप अत्यंत वेगाने जात होता. लागलीच सर्प मित्र बबन भुसारे यांना तात्काळ फोन वरच परिसरात साप असल्याची माहिती दिली.तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी येवून तो साप पकडला आणि तो साप जंगलात सोडण्यासाठी निघून गेले. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा टाकला.

हदगाव शहरासह संपूर्ण जवळपास च्या परिसरात कुठे ही आणि कितीही मोठा साप दिसला की लोक सर्पमित्र बबन भुसारे यांना फोन करतात आणि ते ताबडतोब त्या ठिकाणी जावून सापाला पकडतात आणि तो साप किनवट च्या जंगलामध्ये नेवून सोडतात हे कार्य ते फक्त समाजसेवा आणि प्राण्यावर च्या प्रेमापोटी करतात परंतु हे करतांना त्यांना जो काही खर्च होतो व त्यांचे कामात अडथळा येतो त्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप साधारण असल्यामुळे त्यांना सरकार ने मानधन द्यावे असे सर्व नागरिकांतून बोलल्या जात आहे. आतापर्यंत त्यांच्यामुळे हजारो सापांना जीवदान मिळाले आहे तसेच साप पासून कित्येक लोकांचा जीव वाचला आहे. अशा माणसाचा जर सरकारने विचार करून मानधन दिले तर त्यांना मदत होईल आणि लोक सुद्धा सापाला न मारता निसंकोचपणे बबन भुसारे ला बोलावतील.
चौकट :
सर्पमित्राची व्यथा

मी गेली अनेक वर्षे साप पकडून त्यांना निसर्गात सोडण्याचे काम करीत आहे. फोन आला की मी हातातले काम अर्धवट सोडून घटनास्थळी पोहोचतो.मि हे सर्व निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमातून हे काम करीत आहे. पण या कामाबद्दल शासनाकडून प्रोत्साहन मिळाले पाहिजे.एवढीच खंत व्यक्त करतो.

  • बबन भुसारे, सर्पमित्र हदगाव.