
तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर,राळेगाव
्राळेगाव तालुक्यातील वनोजा गावात गेल्या काही दिवसापासुन ताप,सर्दी, खोकला या आजाराने थैमान घातले असून कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.या आजाराने गावातील मृत्यूचे प्रमाण वाढले असून गावातील प्रत्येक नागरिक भीतीने दहशतीत जिवन जगत आहे. अशातच कोरोना सारख्या भयंकर आजाराने सगळीकडे हाहाकार माजला असून वनोजावासी जनतेच्या मनात सुद्धा कोरोनाची भिती निर्माण झाली असून या भयावह भिती जनतेच्या मनातून बाहेर काढण्यासाठी वनोजा गावात आरोग्य तपासणी कैंप लावून प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने वनोजा येथील सरपंच्या सौ चंदा म. पोटरकर. व उपसरपंच श्री. प्रभाकर दांडेकर, तसेच पोलीस पाटील श्री. श्रीकांत वटाने यांनी मा.तहसिलदार,तहसील कार्यालय राळेगाव यांना निवेदन दिले असून त्या पत्राची एक प्रत मगटविकास अधिकारी पं. स.राळेगाव यांना पाठविल्याचे प्रसिद्धि पत्रकाद्धारे कळविले आहे
