
सहसंपादक:प्रशांत बदकी
वाशिम – शासनाच्या अखत्यारीत असलेल्या पणन महासंचालनालय पुणे यांनी २९ एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हयातील वैश्विक महामारीची भयावह स्थिती पाहता रुग्णांना वेळेवर आणि त्वरीत उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील सर्व बाजार समित्यांमध्ये कोविड केअर सेंंटर उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात १० मे रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदना नमूद केले आहे की, जिल्हयामधील कोरोना महामारीची भयावह स्थितीस कोणीही अपरिचित नाही. व प्रत्येक घटक भयभित झाला आहे. समाजामध्ये कार्यरत सेवाभावी संस्था व प्रशासन खांदयाला खांदा लावून सोबत सोयी सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत. आरोग्य सेवेमधील डॉक्टर्स, कर्मचारी सतत काम करीत आहेत. या स्थितीमध्ये आपला सहभाग देणे, या विपरीत व भयावह वातावरणामध्ये कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी सक्रिय सहभाग पुरेसे देणे आवश्यक असून संघटीत स्वरुपात देणे गरजेचे आहे. जिल्हयामधील कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड सेंटर सुविधा उभारणे आवश्यक असून गरजेचे आहे. त्यामुळे कोविड महामारीमध्ये रुग्णांकरीता नविन कोविड सेंटर उभारण्यााबाबत कार्यवाही करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रमुखांनी योग्य, यथोचित, मानवतावादी दृष्टीकोन ठेवून निर्णय करावा व समाजाला, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करुन सह्दयता दर्शवावी. विदर्भामध्ये कोविड सेंटरची निकड विचारात घेवून शेजारील जिल्हा क्षेत्रामधुन सहकार सेनेचे सरचिटणीस विठ्ठलभाऊ लोखंडकर परिपत्रकाचे मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाहीची मागणी केली आहे. ही बाब देखील विचारात घ्यावी असे मत आहे. काळाची गरज व मानवतावादी दृष्टीकोन ठेवून निर्णय व्हावा व आवश्यक निर्देश संबंधीतांना देण्यात यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
