अपघात वार्ता:रेल्वे लाईन वर कटुन अज्ञात इसमाचा मृत्यू

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

वरोरा शहरांकडुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक अज्ञात इसमाचा रेल्वे लाईन वर कटुन मृत्यू झालेला आहे. ही घटना दिनांक 17 /05/2021 ला पहाटे घडली आहे .घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्टेशन वरोरा कडून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.मृत व्यक्ती जवळ कोणतेही ओळख पत्र किंवा साहित्य मिळाले नसल्याने ओळख पटू शकली नाही.तसेच या मृत इसमाच्या परिजनांनी पोलीस स्टेशन वरोरा ला संपर्क साधून मृतदेह ताब्यात घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.