गरजूंसाठी जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध खा राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)


आज दिनांक 21 मे
अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव राष्ट्रीय नेते स्व राजीवजी सातव यांचा दुःखद निधन झाले, त्यांना यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली,
कोरोनाच्या वैश्विक महामारीत संबंध जग होरपळून निघत असतांना मागील वर्षी पासून सतत यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे, याचाच एक भाग म्हणून माहिती व तंत्रज्ञान चे जनक स्व राजीवजी गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून, जिल्हा भर ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरजू साठी उपलब्ध करून देण्याची मोहीम आखलेली आहे त्याचाच एक टप्पा म्हणून
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, कोरोना सहाय्यता कक्ष च्या वतीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी च्या कार्यालयात 5 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर विनामूल्य रुग्णांना दि 21 मे स्व राजीवजी गांधी यांचे पुण्यतिथी पासून उपलब्ध करून दिले आहेत, याचे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा, बाळासाहेब मागुळकर, राहुल ठाकरे, अनिल गायकवाड, जावेद अन्सारी, जितेश नावडे आदी उपस्थित होते, सदर ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आ डॉ वजाहत मिर्झा यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात आलेत, गरजूंना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर साठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातील, कोरोना सहाय्यता कक्ष परशुराम कडू 9130684338, प्रवीण इंजाळकर 9503123687, अनिकेत नवरे 8999731299 व पदाधिकारी अनिल गायकवाड 9850153367, जावेद अन्सारी 9765626629, जितेश नावडे 8530967128
यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा यांनी कळविले .