
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली स्नेहा भिवाजी हिचामी (वय 21) रा. घोट. हीने आपल्या राहत्या घरात काल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नायलॉन दोरीने गळफास लावत आपले जीवन संपवले.
तिचे वडील पोलिस विभागात कर्मचारी असून आई व एक भाऊ असे कुटुंब आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीच्या जीवनाचा असा शेवट होण्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
