सिताराम भुते ज्येष्ठ शिवसैनिक यांचा आंदोलनाचा इशारा


हिंगणघाट येथे मलनिस्सारण योजनेअंतर्गत केलेल्या खोदकामामुळे शहरातील जनता त्रस्त झालेली आहे त्यातच खंडोबा वार्ड मध्ये मलंगशहा दर्गा जवळील तीन ते चार महिने आधी गडर लाईन व पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली त्या खोदकामामुळे नाल्यातील पाणी साचले होते दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे दर्ग्याजवळ पूल तोडण्यात आला. तेव्हा या प्रभागातील नगरसेवक श्रीधर कोटकर व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. ब्रेकर मशीन चे द्वारे हा पूल तोडून साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. परंतु जनतेला येणे जाण्याचा मार्ग मध्ये अडथळा निर्माण झाला यासंबंधी नगराध्यक्ष साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आले असून हा पूल कधी बांधण्यात येईल रस्ता कधी सुरळीत चालू होईल याकडे खंडोबा वार्ड वासियांचे लक्ष लागलेले आहे. या कामामुळे कामाकडे त्वरित लक्ष जर दिल्या गेले नाही तर नगरसेवक श्रीधर कोटकर व ज्येष्ठ शिवसैनिक सिताराम भुते यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.