चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या वतीने सेनिटायझर,मास्क वाटप लसिकरण नाव नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन

पोंभुर्णा प्रतिनिधी:आशिष नैताम

:- कोरोणा महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला असताना जनतेला खबरदारी चा उपाय म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला मास्क व सेनिटायझर वाटप करण्यात आले.तसेच लसिकरनासाठी आँनलाईन नाव नोंदणी सेवा केंद पोंभुर्णा येथील जेष्ठ नागरिक येल्लया श्रीगीरीवार यांच्या हस्ते पार पडले.
मास्क व सेनिटायझर वाटप कार्यक्रम तसेच लसिकरण नाव नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन ओमेश्वर पद्मगीरीवार यांचे कार्यालय सावित्रीबाई फुले चौक पोंभुर्णा येथे पार पडले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी :- ओमेश्वर पद्मगीरीवार, अमरसिंह बघेल माजी नगरसेवक, अशोक गेडाम, मुर्लिधर टेकाम, माधुरी चांदेकर माजी नगरसेविका, सविता गेडाम माजी नगरसेविका, आनंद पातळे,हिमगीरी बैस,राजु बोलमवार, राकेश नैताम, नरेंद्र नैताम, दयानंद गुरुनुले,नंदु बुरांडे, सखाराम तुराटे, बालाजी भांडेकर, सुनील कुंदोजवार,गौतम वनकर, शारदा नैताम, इत्यादी अनेकांनी सहकार्य केले.