
प्रतिनिधी : परमेश्वर सुर्यवंशी
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारचे यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्या बद्दल भारतीय जनता पार्टी हिमायतनगर(वाढोणा)जि.नांदेड तर्फे डॉक्टर व परीचारीका अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोरोना योद्धांचा सत्कार.
आज देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवाकार्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने…
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर
सेवाकार्य दिनाचे प्रमुख
मा श्रावण पाटील भिलवडे यांच्या सूचनेवरून
आज दिनांक ३१ मे रोजी हिमायतनगर (वाढोणा)भाजपा तालुकाध्यक्ष श्री आशिष सकवान* यांच्या हस्ते व सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये आज हिमायतनगर (वाढोणा)शहरात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी डी गाकवाड साहेब, श्री.किशनराव पाटील पळसपूरकर, भाजपा शहर अध्यक्ष मा खंडु एम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ॲम्बुलन्स ड्रायव्हर, लॅब टेक्नीशियन, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्वांनी मिळून कोरोना महामारी मध्ये लोकांसाठी दिवस-रात्र एक करून समाजातील सर्व घटकाला सोबत घेऊन रुग्णसेवा केली. त्याबद्दल आज ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी 45, शहरातील 35, अंगणवाडी सेविका व कोरोना योद्धां चे सन्मानपत्र व फुलाचे बुके देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास
डॉ माधव भुरके (वैद्यकीय अधिकारी)
डॉ शिल्पा जाधव,डॉ संतोष किशवे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष
राम सूर्यवंशी मा हिदायत खान पठाण (अल्पसंख्याक आघाडी)
युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम जाधव
परमेश्वर पाटील वटफळीकर, पोशटी जाधव, निलेश चटणे, बालाजी ढोणे, सुभाष माने, बालू ढोणे यासह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होती. व तसेच हिमायतनगर तालुक्यात पळसपूर, कारला, एकंबा, सवना, मंगरूळ या गावा सह तालुक्यातील 17 गावामध्ये सेवाकार्य दिनानिमित्य कार्यक्रम घेण्यात आले आहे.या कालावधीमध्ये गावात फवारणी करणे साफसफाई करणे त् समाज मंदिर मंदिर या परिसरात साफसफाई करणे हे कार्य त्या गावा करण्यात आले तसेच त्या गावातील अंगणवाडी सेविका येथे आरोग्य सेवकाचे सत्कार सन्मान करणे हे सर्व कार्य भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे करण्यात आलेली आहे.
