निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा – मनिष डांगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सहसंपादक:प्रशांत बदकी


निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा – मनिष डांगे
जिल्ह्यामध्ये एकूण 97, 608 लाभार्थी आहेत यामध्ये संजय गांधी निराधार योजना 29, 171
श्रावण बाळ योजना 50, 300
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, 00419 इंदिरा गांधी दिव्यांग योजना 00028 या सर्व लाभार्थ्यांना मासिक एक हजार रुपये त्वरित मदत देण्याची घोषणा झाली होती मात्र निधी वेळीच उपलब्ध न झाल्याने हे लाभार्थी वंचितच राहिले आहेत मा महोदयांनी आपण जवाबदार पालक असल्याचे कृतीने दाखवून देण्याची गरज असल्याचे ध्यानी घेऊन तातडीने कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात अन्यथा अंदोलन करण्यात येईल.असे निवेदन मनसेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिले
यावेळी विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेवराव जुमडे महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे , मोहन कोल्हे, मनिष महल्ले, श्रीकांत इंगोले, सुहास जाधव, श्री देशमुख, वेदांत ढवळे, प्रतिक कांबळे, मयूर दाभाडे, किशोर गजरे, विष्णू शिखरे, गजानन गिरी, भागवत वानखेडे, मोहंमद नैरागाबादी, मोहंमद चौधरी, संतोष पवार, सतीश कडवे,गणेश केदार,देवानंद खरे,राजू शिरळ, समाधान खरे, हर्षद चव्हाण, प्रशांत पढघाण, शंतनू तुरेराव, मयुरेश सत्तरके,शंतनू ब्रम्हेकर, सारंग दायमा आदी उपस्थित होते