परवानाधारक ऑटोचालकांच्या अनुदानाला विलंब:मनीष डांगे ,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम चाआंदोलनाचा इशारा

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी


वाशिम – टाळेबंदीकाळात तात्पुरता आधार म्हणून शासनाच्या वतीने जाहीर झालेले प्रत्येकी १५०० रुपये अनुदान अद्यापही परवानाधारक अ‍ॅटोरिक्षाचालकांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे अ‍ॅटोचालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या बाबीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी अध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व आरटीओ विभागाला निवेदन देण्यात आले.
शासनाने परवानाधारक अ‍ॅटोचालकांना तात्पुरता आर्थिक दिलासा म्हणून प्रत्येकी रुपये १५०० त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली. परंतु पात्र लाभार्थी आर्थिक लाभापासून वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे अनुदानाची कमतरता व अनुपलब्धता आहे. त्यातच कार्यालयामध्ये असलेल्या कर्मचार्‍यांची अत्यल्प संख्या हे सुध्दा आहे. तसेच वेळोवेळी घोषित होणोर निर्बंध, लाभार्थ्यांचे ऑनलाईन बँकींग संदर्भातील अज्ञान हे सुध्दा असू शकते. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी तोडगा काढून अ‍ॅटोचालकांना त्यांची आर्थिक उपासमार होण्यापासून वाचवावे. अ‍ॅटोचालकांना वेळीच लाभ मिळाला नाही तर त्यांच्यात असंतोष पसरु शकते. याबाबत त्वरीत ठोस कार्यवाही न झाल्यास पक्षाच्या वतीने शांततामय मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.