राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूरचे सुमित (गोलु) डोहने यांच्या कडून N95 मास्क वाटप

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर

सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस चे सुमित उर्फ गोलू डोहणे यांच्या तर्फे गेल्या २ दिवसा पासून बुद्ध नगर वॉर्ड व संतोषी माता वॉर्ड परिसरात N95 मास्क वाटप करण्यात आले. या प्रसंगी नंदू पाल, लालू शेंडे, गणेश नायडू, रोशन बोम्मावार, रिकी कैथवास, अमन बंसेल, मोनू कैथवास, रितेश अलोने, प्रिन्स मेश्राम, शुभम लभाने, आरिफ खान, संस्कार सुखदेवे, यश देवगडे, गौरव मेश्राम, अर्पित भगत यांनी सहकार्य केले।