33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी साठी उच्चस्तरीय समिती गठीत करा: रोशन लाल बिट्टू,एनएसयुआयच राष्ट्रीय सचिव यांची मागणी

प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर

चंद्रपूर – फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली होती, तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्वकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती समोर आली होती.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
33 कोटीपैकी किती वृक्ष आजघडीला जिवंत आहे याची कुठं माहितीच नाही याकरिता या मोहिमेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
वर्ष 2014 ते 19 दरम्यान मोठा गाजावाजा करीत फडणवीस सरकारने ही मोहीम राबवली मात्र यामध्ये लावण्यात आलेले वृक्ष अस्तित्वात आहे की नाही यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, म्हणून ठाकरे सरकारने या 33 कोटी वृक्ष लागवडीची उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी झाली पाहिजे यासाठी रोशन लाल बिट्टू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल आहे.