

सहसंपादक:प्रशांत बदकी
लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
जामगाव येथील रहिवासी असलेल्या दिनेश गोरवे वय वर्ष 39 या इसमावर सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान राजू झिंगे रा.जामगाव वय 38 याने धारदार चाकूने हल्ला चढविला.त्यात दिनेश गोरवे गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.जखमी दिनेश गोरवे याच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत.आरोपी राजू झिंगे व दिनेश गोरवे यांच्यात पूर्व वैमनस्य असल्याने हा प्राणघातक हल्ला केल्याचे कळते.यात अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात आहे.
