

प्रतिनिधी:सुमीत शर्मा,नाशिक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सुचनेनुसार आणि बाळासाहेब थोरात, शरदभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको ब्लॉक काँग्रेस तर्फे आज सिडकोत सायकल चे पूजन करून अभिनव आंदोलन करण्यात आले.
आज सर्व सामान्य जनता महागाई खाली होरपळत असताना बीजेपी सरकार मात्र स्वतःचे कार्यालय आणि निवडणुका ह्यात व्यस्त दिसते आहे. त्या सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 1000 ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून सिडको विभागात दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले त्यातील एक आंदोलन संतोष ठाकूर अध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस जमाती यांच्या तर दुसरे आंदोलन भरत पाटील ब्लॉक उपाध्यक्ष यांच्या नेतृत्व खाली करण्यात आले.
त्या प्रसंगी ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष इम्रान अन्सारी, कार्याध्यक्ष देवेंद्र देशपांडे, महिला अध्यक्ष शिरोड ताई, पर्यावरण अध्यक्ष वंदनाताई पाटील, विधानसभा युवक अध्यक्ष मनोज साठे, उपाध्यक्ष सुरज चव्हाण, बादशाह खान, गणेशभाऊ पाटील आधी उपस्थित होते
